18 February 2020

News Flash

फुटबॉल खेळताना युवकाचा मृत्यू

डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

घाटकोपरच्या सोमैया  विद्यालयात वार्षिक खेल महोत्सवामध्ये फुटबॉल खेळत असताना एका २६ वर्षीय युवकाचा सोमवारी मृत्यू झाला. प्राथमिक तपासात या विद्यार्थ्यांला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी एका २२ वर्षीय विद्यार्थ्यांचा अशाच प्रकारे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

निर्भयकुमार मिश्रा असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो सोमैया महाविद्यालयात एमबीएच्या दुसऱ्या वर्षांत शिकत होता. मूळचा पुण्याचा असलेल्या निर्भयकुमार महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. महाविद्यालयाच्या वार्षिक खेल महोत्सवात सोमवारी फुटबॉलचा सामना सुरू असताना निर्भयकुमार पाणी पिण्यासाठी मैदानाबाहेर गेला. मात्र याच वेळी त्याला अचानक चक्कर आल्याने तो जमिनीवर कोसळला. येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला शीव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. येथील डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले आहे.

First Published on January 17, 2020 1:07 am

Web Title: death of a youth while playing football abn 97
Next Stories
1 रुग्णालयातील ४२ लाख रुपयांची यंत्रे वापराविना
2 राज्यात दरदिवशी ५१ मुले हिंसेची शिकार
3 ‘माय मराठी’ अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात
Just Now!
X