29 September 2020

News Flash

नाल्यात पडलेल्या आई- मुलीचा मृत्यू

घरावर संरक्षक भिंत कोसळल्याने दुर्घटना

प्रतिकात्मक फोटो

सांताक्रूझ-वाकोला परिसरातील धोबीघाट येथील वाकोला नाल्यालगतच्या दोन घरांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मुली आणि एक महिला नाल्यात पडल्या. चौघींपैकी दोघींचा मृत्यू झाला असून एक मुलगी अद्याप बेपता आहे. एका तीन वर्षीय मुलीला वाचविण्यात यश आले आहे.

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास वाकोला भागातील अग्रीपाडा रहिवासी संघ येथील त्रिमुर्ती चाळीतील दोन घरांवर संरक्षक भिंत पडली. त्यामुळेही दोन्ही घरांचा भाग नाल्यात कोसळला. एका घरातील २६ वर्षीय महिला तीन मुलींसह नाल्यात पडली. नाला दुथडी वाहत असल्याने चौघी त्यात वाहून गेल्या. स्थानिकांनी वाहून जाणाऱ्या तीन वर्षीय शिवन्याला नाल्यातून सुखरुप बाहेर काढले. तिला तात्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. दुपारी ४ च्या सुमारास जान्हवी काकडे (१.५) या मुलीला एनडीआरएफने नाल्यातून बाहेर काढले. तर पाचच्या सुमारास रेखा काकडे (२६) यांना बाहेर काढण्यात आले. या दोघींचा मृत्यू झाला. अद्यापही सात वर्षीय श्रेया बेपत्ता आहे. दुर्घटना घडली त्यावेळी रेखा यांचे पती कामावर गेल्यामुळे ते बचावले. ते पालिकेत कार्यरत आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. अंधार पडल्यामुळे मंगळवारी रात्री बचावकार्य थांबविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोराईच्या मासेमारी बोटीवरील ११ बचावले; दोघे बेपत्ता

भाईंदर : गोराई परिसरातील मच्छीमारांची ‘लकी स्टार’ ही बोट मंगळवारी समुद्रात जोरदार लाटांच्या तडाख्याने बुडाली. या बोटीवरील १३ मच्छीमारांपैकी ११ जणांना वाचविण्यात यश आले आहे. दोन मच्छीमारांचा शोध सुरू आहे.

भाईंदर पश्चिमेकडील गोराई भागातील ही मासेमारी बोट दोन दिवसांपूर्वी १३ जणांसह समुद्रात गेली होती. मंगळवारी सकाळी वातावरणात बदल होऊन समुद्र खवळला. प्रचंड लाटेच्या तडाख्याने ही बोट बुडाली. यापैकी ११ मच्छीमारांना उत्तन येथील ‘गॉडकिंग’ या बोटीच्या साहाय्याने वाचवण्यात आले. दोन मच्छीमारांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:27 am

Web Title: death of mother daughter in nala abn 97
Next Stories
1 मॉल, व्यापारी संकुले आजपासून सुरू
2 मुंबईत दोन महिन्यांतील सर्वात कमी रुग्णसंख्या!
3 प्रवीण परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर
Just Now!
X