एसटीच्या ६६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होऊन  दोन जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एसटीच्या आढावा बैठकीत देण्यात आली.

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही आढावा बैठक घेतली. मृत्यू झालेल्यांत जळगावमधील एका चालकाचा समावेश आहे. तर, दुसरा कर्मचारी  बुलडाणा लेखा विभागातील असून तो मात्र कर्तव्यावर नव्हता. कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी एसटीकडून अधिकारी नेमला जाणार आहे. करोना  झालेल्यांत मुंबई, ठाणे, पनवेल विभागातील सर्वाधिक  कर्मचारी असून त्याखालोखाल जळगाव, बुलडाणा आणि अन्य विभागांतील आहेत.