30 September 2020

News Flash

चिमुकलीसह पत्नीची हत्या करणाऱ्यास फाशी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीची चाकूने हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रकांत आयरे (३५, रा. नालासोपारा) यास वसई सत्र न्यायालयाने गुरूवारी फाशी सुनावली.

| February 14, 2014 03:13 am

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीची चाकूने हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रकांत आयरे (३५, रा. नालासोपारा) यास वसई सत्र न्यायालयाने गुरूवारी फाशी सुनावली.
चंद्रकांत याने पत्नी संचिता (२५) आणि मुलगी वैष्णवी (दीड वर्ष) या दोघींवर चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घरातून रक्त बाहेर येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचरण केले. मे २०११ मधील या प्रकरणात चंद्रकांतला अटक झाली होती. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी वसई सत्र न्यायालयाचे न्या. एस. जे. खैरनार यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. उज्जवला मोहोळकर यांनी युक्तीवाद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 3:13 am

Web Title: death sentence to killer of girl and wife
टॅग Death Sentence
Next Stories
1 आजारपणाचा खर्च न झेपल्याने मुलाकडून आईची हत्या
2 कांदिवली, मालाड, अंधेरीत पाणीकपात
3 आमच्या विधानाचा विपर्यास : खा. संजीव नाईक
Just Now!
X