11 August 2020

News Flash

मुंबईतील मृतांची संख्या ४ हजार ९९९

मृत्यूचा दर ५.८ वर कायम

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईत मंगळवारी करोनाच्या नवीन ८०६ रुग्णांची, तर ६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी मुंबईतील एकूण मृतांची संख्या ४ हजार ९९९ झाली आहे. मृत्यूचा दर ५.८ वर कायम आहे.

गेल्या काही दिवसात हजार ते दीड हजाराच्या दरम्यान रुग्णांची मुंबईत नोंद होत असताना मंगळवारी गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंद झाली आहे. मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ८६ हजार १३२ वर गेला आहे. मंगळवारी ९८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत ५८ हजार १३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील करोनामुक्त रुग्णांचा दर ६७ टक्कय़ांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत २२,९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:33 am

Web Title: death toll in mumbai is 4999 abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून मास्क, सॅनिटायझर वगळले
2 परीक्षा घेण्यास राज्य असमर्थ!
3 ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम यंदा ३० टक्के कमी
Just Now!
X