28 October 2020

News Flash

वर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती

मे ते ऑगस्ट अशा चार महिन्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढले आहे

संग्रहित छायाचित्र

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव, अन्य आजार असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळणे अशा अनेक कारणांमुळे गेल्या चार महिन्यांत मुंबईतील मृत्यूसंख्येत मोठी वाढ झाली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास वर्षअखेरीस मुंबईतील एकूण मृतांची संख्या एक लाखाच्या वर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मे ते ऑगस्ट अशा चार महिन्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ६० हजार १९० जणांचा मृत्यू झाला होता. तर यंदा जानेवारी ते ऑगस्ट काळात ७३ हजार ६५५ जण मृत्युमुखी पडले आहेत. गतवर्षी मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये अनुक्रमे ७३३५, ६७३२, ७९३१, ८१६४ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा याच काळात अनुक्रमे ९१६१, १५,७५६, ११,७७०, १०,२१५ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना संसर्ग होण्याच्या भीतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात जाण्यास केली जाणारी टाळाटाळ, तसेच खाटा मिळण्यातील अडचणींमुळे मृत्यूसंख्या वाढत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

झाले काय? : मुंबईत विविध आजारांनी, व्याधींनी, अपघाताने, वृद्धापकाळाने, तसेच आकस्मिक मृत्यू झालेल्यांची महिनानिहाय माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी पालिकेकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या आधारे पालिकेने यादव यांना मृत्यूबाबतची महिनानिहाय आकडेवारी सादर केली. त्यातून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती उजेडात आली आहे. काही नैसर्गिक मृत्यू वगळता वैद्यकीय उपकरणांचा अभाव, तसेच उपचारातील दिरंगाईमुळे विविध आजारांनी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे, असा आरोप यादव यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 2:45 am

Web Title: death toll in mumbai is expected to touch one lakh by the end of the year zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई!
2 प्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी
3 मुख्यमंत्री, शरद पवार, थोरात यांच्यात खल
Just Now!
X