News Flash

देवनार क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे कंत्राट रद्द होणार

देवनार क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी दिलेले कंत्राट रद्द

आज स्थायी समितीत प्रस्ताव
देवनार क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी दिलेले कंत्राट रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
देवनार क्षेपणभूमीवर जमा होणाऱ्या २ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर दर दिवशी प्रक्रिया करुन त्यापासून खत निर्माण करण्यास कंत्राटदार अपयशी ठरला आहे. त्यामुळे कंत्राटदाराला शास्त्रोक्त पद्धतीने ही क्षेपणभूमी बंद करण्यासाठीचे दिलेले कंत्राट रद्द करण्यात येणार आहे.
देवनार क्षेपणभूमी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर २०९ मध्ये संबंधित कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. या क्षेपणभूमीवर दररोज २ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करता येईल, असा प्रकल्प उभारणे व क्षेपणभूमी बंद करण्याची कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र यावर कार्यवाही न झाल्याने हे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 8:36 am

Web Title: decision about deonar dumping ground
टॅग : Standing Committee
Next Stories
1 सीसीओ-एटीव्हीएम यंत्रे रेल्वे स्थानकापासून दूरच ; मध्य रेल्वेवर ४८ यंत्रे पेटीबंद अवस्थेत पडून
2 कोळशामागे प्रदूषण की उद्योग ? वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
3 राज्याचे मुख्य सचिव बदलण्याच्या हालचाली
Just Now!
X