वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल्स आणि त्यांच्या अन्य मागण्यांप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन गणेशोत्सवानंतर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘युनायटेड फोरम ऑफ न्यूजपेपर्स’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
वृत्तपत्रे ही जनतेची महत्त्वाची गरज असून त्यांची विक्री करणारे विक्रेते मात्र हाल, अडचणींमधून मार्ग काढून वृत्तपत्रांची विक्री करीत असतात. अशा वेळी महापालिका अधिकारी अथवा पोलीस मात्र या विक्रेत्यांवर विनाकारण कारवाई करतात, अशी तक्रार ‘फोरम’च्या पदाधिकाऱ्यांनी केली. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांनाही ठाण्याप्रमाणेच कायमस्वरूपी स्टॉलसाठी जागा द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.
या बैठकीला उद्योगमंत्री नारायण राणे, नीतेश राणे, दांगट न्यूजपेपर एजन्सीचे बाजीराव दांगट, पराग दांगट, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे हरी पवार, नरहरी औटी, गोपीनाथ चव्हाण, हेमंत मोरे, संजय पावसे, संतोष विचारे, मुंबई-ठाणे वृत्तपत्र विक्रेता एकीकरण समितीचे अजित पाटील, जयवंत डफळे, मधू सदडेकर, रवी चिले, शिरीष पवार, अजित सहस्त्रबुद्धे, सी.एल.सिंग तसेच विविध वृत्तपत्रांचे संपादक उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 1:27 am