News Flash

मोहफुलांवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय

नाना पटोले यांच्या लढय़ाला यश

संग्रहीत छायाचित्र

नाना पटोले यांच्या लढय़ाला यश

मुंबई  : मोहफुलांवर सद्य:स्थितीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ या कायद्याअंतर्गत असलेले निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. हा निर्णय व्हावा यासाठी १९९९ पासून आपण संघर्ष करत होते. आज या प्रदीर्घ लढय़ाला यश आले आहे. या निर्णयाचा विदर्भातील जनतेला मोठा फायदा होणार असून यामुळे प्रक्रिया उद्योग आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता मोहफुले गोळा करणे, बाळगणे व राज्यांतर्गत मोहफुलांची वाहतूक करण्यावरील निर्बंध उठवले आहेत. आता यासाठी परवानगीचीही आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे यंत्रणेकडून या व्यवसायातील आदिवासी बांधव, गरीब शेतकरी व संस्थांची होणारी पिळवणूक संपुष्टात येईल. तसेच परराज्यात निर्यातीचे धोरण खुले ठेवल्यामुळे मोहफुले गोळा करणाऱ्यांना योग्य दर मिळेल, असे पटोले यांनी म्हटले आहे.

आदिवासी विकास विभागालाही मोहफुले वापराकरिता नवीन योजना तयार करण्यात येणार आहेत. या योजनांतर्गत मोहफुलांच्या व्यापाराकरिता एफएफ-२ अनुज्ञप्ती आवश्यक असणार आहे. या अनुज्ञप्ती आदिवासी सदस्य असलेल्या आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था, ग्रामपंचायत अशा प्रकारच्या मुंबई मोहफुले अधिनियम १९५० मधील नियम २ सी नुसार मान्यताप्राप्त संस्थांना नवीन एफएफ-२ परवाने मिळणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णयही आज गृह विभागाने काढला आहे.

विदर्भातील वनांसोबत शेतकऱ्यांच्या शेतामध्येही मोठय़ा प्रमाणात मोहफुलांची झाडे आहेत. त्या शेतकऱ्यांनाही आता उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 1:59 am

Web Title: decision to remove restrictions on mahua flower success to nana patole zws 70
Next Stories
1 मोफत लसीकरणाच्या मोदींच्या आश्वासनाचे काय झाले? – मोहन जोशी
2 मूक-बधिरांसाठी विशेष चिन्ह असलेल्या मुखपटय़ा उपलब्ध करण्याबाबत विचार करा
3 प्रा. सदानंद मोरे यांचे आज व्याख्यान
Just Now!
X