06 December 2020

News Flash

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाजवळच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

(संग्रहित छायाचित्र)

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या  परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनास दिले.

सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय जागेबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात व जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे जाईल व सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावाने असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू करावी.

तर वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबतचा प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता)  सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग २० एकर जागा असणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जागा त्वरित हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:17 am

Web Title: decision to set up a medical college near sindhudurg district hospital abn 97
Next Stories
1 अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
2 वैद्यकीय अधीक्षक पदावरून दूर
3 स्तनपान करणाऱ्या बाळाचा ताबा आईकडेच
Just Now!
X