News Flash

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कात घट

राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांची आढावा बैठक गुरुवारी झाली

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कात घट

मुंबई : राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शुल्क साधारण २५ टक्क्यांनी कमी होणार असून शुल्क १६ हजार २५० रुपयांनी कमी करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबत घोषणा केली.

राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांची आढावा बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत शुल्ककपातीचा निर्णय घेण्यात आला. नियमित शुल्करचनेनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासह इतर सुविधांचे शुल्कही भरावे लागते. करोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थी महाविद्यालयांत प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. त्यामुळे ग्रंथालय, जिमखाना, अशा सुविधांचे शुल्क कमी करण्यात येणार आहे. राज्यातील साधारण २० हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. ‘करोनाकाळात विद्यार्थी, पालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे सामंत यांनी सांगितले.

या बैठकीत शासकीय आणि अनुदानित संस्थांना शिक्षक आणि शिक्षकेतर पदे कंत्राटी तत्त्वावर स्वत:च्या निधीतून भरण्यास मान्यता देण्यात आली. व्हीजेटीआयच्या वसतिगृहाचे ‘मातोश्री’ असे नामकरण

माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) येथील मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या वसतिगृहाचे नामकरण ‘मातोश्री’ असे करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 1:48 am

Web Title: decrease in fees of government engineering colleges akp 94
Next Stories
1 पाऊस क्षीण; पेरणीची घाई नको!
2 सात जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना
3 मध्य मुंबईतही बोगस लसीकरण शिबीर; दोघांना अटक
Just Now!
X