इंधनाच्या दैनंदिन बदलणाऱ्या किंमतीनुसार आज (रविवार) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाली असून पेट्रोल २५ पैशांनी तर डिझेल १८ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे काही काळापूर्वी पेट्रोल ९० रुपये प्रति लिटरच्या पार गेल्यानंतर आजच्या किंमतींमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


ताज्या दरानुसार, मुंबईत आजचा पेट्रोलचा दर ८७.२१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७८.८२ रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोल ८१.७४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७५.१९ रुपये प्रतिलिटर आहे.

यापूर्वी दसऱ्याच्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला होता. त्यानुसार, मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर २१ पैशांनी स्वस्त झाले होते तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर ११ पैशांनी कपात झाली होती.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर नव्वदी पार गेल्याने सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. सातत्याने इंधनाचे दर वाढतच असल्याने सर्वच स्तरातून सरकारवर टीका होत होती. त्यामुळे केंद्राने अडीज रुपयांनी इंधनाचे दर कमी केले होते. तसेच विविध राज्य सरकारांना राज्यांचे कर कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील फडणवीस सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्याने पेट्रोल दीड रुपयांनी कमी झाले होते. त्यामुळे एकूण ४ रुपयांनी पेट्रोलचे दर स्वस्त झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decrease in fuel prices petrol cost 25 paise and diesel 18 paise decrease
First published on: 21-10-2018 at 09:03 IST