News Flash

बेस्ट कर्मचाऱ्यांमधील करोना संक्रमणात घट

रोज सरासरी ५०० कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या ४५ दिवसांत बेस्ट कर्मचाऱ्यांमधील करोना संक्रमणात उल्लेखनीय घट झाली आहे. ‘ऑपरेशन शून्य मृत्यू’अंतर्गत वेळेत निदान आणि उपचारांच्या अनुकूल परिणामांसाठी पालिकेने बेस्ट आगारांमध्ये ५७ जलद प्रतिजन चाचणी शिबिरे घेतली.

आतापर्यंत ५ हजार १९८ सर्वसाधारण कर्मचाऱ्यांची प्रतिजन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी फक्त ३२ (०.६ टक्के ) कर्मचारी करोनाबाधित आढळले. त्यापैकी २५ कर्मचारी पूर्णपणे बरे झाले आहेत आणि फक्त ७ कर्मचारी उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार ५ टक्क्यांपेक्षा कमी संक्रमण हे प्रमाण चांगले लक्षण मानले जाते. आजपर्यंत हे लक्ष्य साध्य करण्यासाठी वैद्यकीय विभागाने आवश्यकतेनुसार सर्व वैयक्तिक संरक्षक उपकरणांचा पुरवठा केलेला आहे. रोज सरासरी ५०० कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते.

व्याख्याने, औषधे..

आतापर्यंत करोनाबाबत चार हजारपेक्षा जास्त जागरूकता व्याख्याने घेण्यात आलेली आहेत. ३० हजारपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी, डी व झिंक गोळ्यांच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे. २ हजार उच्च जोखीमधारक व ३ हजार कमी जोखीमधारक कर्मचाऱ्यांना कर्तव्यापासून आराम देण्यात आलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 12:00 am

Web Title: decreased corona transition among best employees abn 97
Next Stories
1 ब्रिटनमधून आलेल्या १ हजार प्रवाशांचा शोध घेण्यात यश
2 अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ४७ लाखांची भरपाई
3 ब्रिटनवरील हवाई बंदीचा चित्रपटांना फटका
Just Now!
X