एमबीबीएस व बीडीएसच्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच राज्यातील अभिमत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रियाही ताब्यात घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची विद्यापीठाची मागणी होती. मात्र न्यायालयाने स्थगिती देण्यास शुक्रवारी नकार दिला. या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. स्थगिती मिळाली नसली तरी सोमवारी सुनावणी होईपर्यंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. २७ ऑगस्टला ही गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.  एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी सोमवापर्यंत तहकूब करत निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच अभिमत विद्यापीठांकरिता केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले. त्यानंतर वैद्यकीयच्या अभिमत विद्यापीठांकरिताही खासगी महाविद्यालयांबरोबरच दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.