NCB अर्थात अमली पदार्थ विरोधी पथकाने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या अभिनेत्रींना समन्स पाठवून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली आहे. या समन्सला उत्तर देत आपण एनसीबीला तपासात सहकार्य करणार असल्याचं दीपिका पदुकोणने म्हटलं आहे. २६ सप्टेंबरला आपण तपासासाठी हजर होणार आहे असंही तिने सांगितलं आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत. त्यानंतर याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दीपिका, सारा अली खान यांना समन्स बजावण्या आले आहेत. दीपिकाने या समन्सला उत्तर देत आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.