07 August 2020

News Flash

मुंबईच्या पाणीसाठय़ात तूट

सप्टेंबपर्यंत समाधानकारक पाऊस पडल्यास मुंबईकरांची पाणी कपातीतून सुटका होईल.

संग्रहित छायाचित्र

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा लपंडाव सुरू असून आजघडीला गेल्या वर्षीच्या तुलनेत तलावांतील जलसाठय़ामध्ये तब्बल ३.३८ लाख दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे.

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधून मुंबईला दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध असेल, तर मुंबईकरांना पुढील वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होते. यंदा जून महिन्यात हजेरी लावून पाऊस गायब झाला. त्यानंतर जुलैमध्ये पावसाने जोर धरला. मात्र मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावक्षेत्रांमधील पावसाची तुरळक हजेरी चिंतेचा विषय बनू लागली आहे.

अप्पर वैतरणा आणि मोडकसागरच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (१६ जुलै २०२०) पावसाने दडी मारली होती. तानसा, मध्य वैतरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी २ मि.मी, तर भातसाच्या क्षेत्रात ४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तलावांमधून वर्षभर मुंबईकरांना मोठय़ा प्रमाणावर पाणीपुरवठा होत असतो. पालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गुरुवार, १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता सातही तलावांमध्ये तीन लाख ८१ हजार १५३ दशलक्ष लिटर जलसाठा होता. तर गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमधील जलसाठा सात लाख १९ हजार ७७० दशलक्ष लिटर होता. गतवर्षीच्या तुलनेत आजघडीला तलावांमध्ये तीन लाख ३८ हजार ६१७ दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. तर १६ जुलै २०१८ मध्ये तलावांमध्ये १० लाख ३४ हजार ५७१ दशलक्ष लिटर पाणी होते.

सप्टेंबपर्यंत समाधानकारक पाऊस पडल्यास मुंबईकरांची पाणी कपातीतून सुटका होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 12:34 am

Web Title: deficit in mumbais water supply abn 97
Next Stories
1 वरिष्ठ आयपीएस आधिकारी बाधित
2 चक्रीवादळग्रस्तांना लवकरच पूर्ण मदत
3 मोठय़ा करोना आरोग्य केंद्रांतील ८३ टक्के खाटा रिकाम्या
Just Now!
X