29 September 2020

News Flash

इंदू मिल जमिनीचे हस्तांतरण काही महिने लांबणीवर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीच्या हस्तांतरणास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. आंबेडकर स्मारकासाठी जमीन देण्याची घोषणा झाली असली तरी, जमिनीच्या हस्तांतरणासाठी

| March 31, 2013 03:06 am

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जमिनीच्या हस्तांतरणास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. आंबेडकर स्मारकासाठी जमीन देण्याची घोषणा झाली असली तरी, जमिनीच्या हस्तांतरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व संसदेच्या औपचारिक मान्यतेची वाट बघावी लागणार आहे, असे सांगण्यात येते.
इंदू मिलची संपूर्ण जमीन बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी, यासाठी दोन वर्षे आंदोलने सुरु होती. संसदेत  ५ डिसेंबर २०१२ रोजी त्याबाबतची घोषणा करण्यात आली. निवडणुकांमध्ये त्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. परंतु जमिनीचे हस्तांतरण कधी होणार आणि स्मारकाच्या कामाला नेमकी कधी सुरुवात होणार, याबद्दल अद्याप तरी अनिश्चिता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 3:06 am

Web Title: delay in acquisition of indu mill land
Next Stories
1 सौरऊर्जा स्वस्त, पवनऊर्जा महाग!
2 मुंबईला नवे पोलीस आयुक्त मिळण्यास विलंब?
3 वर्सोवा ‘धुळवड’ प्रकरणी अद्याप कारवाई नाही
Just Now!
X