03 April 2020

News Flash

केजरीवाल हाजीर हो! न्यायालयाचे आदेश

कुर्ला न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहण्याबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात न बोलण्याचा केजरीवालांचा सल्ला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना परवानगीविना ‘रोड शो’ काढल्याच्या आरोपाप्रकरणी शनिवारी कुर्ला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. कुर्ला न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहण्याबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘आम आदमी पक्षा’तर्फे मानखुर्द येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत केजरीवाल सहभागी झाले होते. परंतु आवश्यक ती परवानगी न घेताच ही यात्रा काढण्यात आल्याने वाहतूक पोलिसांनी ही यात्रा अध्र्यावरच बंद पाडली होती व केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 5:07 am

Web Title: delhi cm should present in kurla court
Next Stories
1 भन्साळींवरील टीकेच्या निमित्ताने बाजीराव-मस्तानीचे वंशज एकत्र!
2 ‘आयएनएस विराट’ची निवृत्ती ?
3 उपमहानिरीक्षक सुनील पारसकर दोषमुक्त
Just Now!
X