आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कारण दिल्ली हायकोर्टाने कार्ती चिदंबरम यांना तात्पुरता दिलासा देत पुढील सुनावणीपर्यंत ईडीने अटक करू नये असे म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्चला होणार आहे. तोपर्यंत कार्ती चिदंबरम यांना ईडीच्या अटकेपासून अल्प दिसाला मिळाला आहे.

सीबीआयनं कार्ती चिदंबरम यांना 28 फेब्रुवारी रोजी चेन्नईमधून अटक केली होती. पीटर व इंद्राणी मुखर्जी यांच्या आएनएक्स मीडियाकडून आर्थिक लाभ पदरात पडल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. कार्ती चिदंबरम सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांचा सीए भास्करन यांच्या न्यायालयीन कोठडीत २१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना २८ फेब्रुवारी रोजी सीबीआयने चेन्नई विमानतळावरुन अटक केली. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून यामुळे पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.