31 October 2020

News Flash

दिल्लीहून मुंबईला मुलीला भेटायला येणाऱ्या इसमाचा मृत्यू

करोना संशयिताप्रमाणे उपचार देण्यात येत होते.

लॉकडाउनच्या काळात मुलीची चिंता सतावत असल्यामुळे दिल्लीहून मुंबईला येणं एका वयोवृद्ध व्यक्तीला जीवावर बेतलं आहे.  मुंबईकडे वाहनाने प्रवास करणाऱ्या एका इसमाचा मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी निधन झाले.

एक कुटुंब दिल्ली येथून आपल्या मुलीकडे मुंबईला खासगी वाहनाने येत होते. मनोर जवळ आले असता त्यामधील वयोवृद्द इसमाला अस्वस्थ वाटू लागले. सोबत असलेल्या त्यांच्या पत्नीने मनोर येथील प्राथमिक रूग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.  मनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर त्या जेष्ठ व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना मृत्युसमयी ताप (हाय ग्रेड फीवर) असल्याने त्यांना करोना संशयिताप्रमाणे उपचार देण्यात येत होते. दरम्यान त्यांच्या घशाचे नमुने तपासासाठी मुंबई येथे पाठवण्यात येत आहे.

अशाच प्रकारे पालघर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या इतर दोन संशयित मृत्यूप्रकरणी तपासणी करण्यात येत असून मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटवर्तीयांना सध्या अलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 8:45 pm

Web Title: delhi man dead in manor nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 VIDEO: धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर
2 लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा, CNG, PNG गॅसच्या किंमतीत कपात
3 धारावीत करोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याचा इशारा
Just Now!
X