News Flash

आरोपींना फाशीची मागणी करणार-आयुक्त

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी मिळावी, अशी मागणी न्यायालयात करणार असल्याचे

| September 15, 2013 04:53 am

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी मिळावी, अशी मागणी न्यायालयात करणार असल्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली होती. त्या धर्तीवर या आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणातले दोषारोपपत्र येत्या मंगळवारी न्यायालयात सादर केले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. या आरोपींनी दोन वेळा सामूहिक बलात्काराचे गंभीर कृत्य केले होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 4:53 am

Web Title: demand death penalty to rapist bmc ceo
Next Stories
1 फरार अश्फाकला अटक
2 नाराजीचे कारण ‘अंदरकी बात है’
3 मुख्यमंत्री-राज ठाकरे भेटीत काय शिजले?
Just Now!
X