News Flash

शाळा सुरू झाल्याने डिजिटल उपकरणांच्या मागणीत वाढ

पूर्वी शाळा सुरु झाली की वह्या खरेदी करणे, त्या सजवणे, विषयाची नावे घालणे अशा विविध कामांचे वेध विद्यार्थ्यांंना लागयचे.

दुकानांमध्ये गर्दी; बाजारात नवे टॅब, कमी किमतीच्या मोबाइलला मागणी

मुंबई : वर्गाची जागा ‘लॅपटॉप, मोबाइल, टॅबने आणि वह्या पुस्तकांची जागा पीडीएफ फाइलने घेतली असल्याने नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून शैक्षणिक साहित्याच्या दुकानापेक्षा इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये अधिक गर्दी दिसते आहे. गॅझेट ही मुलांची गरज झाल्याने दुरुस्ती आणि नवी खरेदी यासाठी गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची मागणी वाढली आहे.

पूर्वी शाळा सुरु झाली की वह्या खरेदी करणे, त्या सजवणे, विषयाची नावे घालणे अशा विविध कामांचे वेध विद्यार्थ्यांंना लागयचे. पण करोनामुळे शिक्षण ऑनलाइन झाल्याने नवे यंत्र हाताळायला मिळणे हे मुलांसाठी औत्सुक्याचे झाले आहे. परिणामी बाजारपेठेत मोबाइल, लॅपटॉप, टॅब यांची मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जुनी उपकरणे घेण्याकडेही ग्राहकांचा कल आहे.

‘गॅझेट खरेदी करणारे दोन प्रकारचे ग्राहक आहेत. एका वर्गाकडून लॅपटॉप, टॅब अशी महागडी यंत्रे खरेदी केली जातात तर एक वर्ग आहे जो जास्त क्षमतेच्या आणि कमी किमतीच्या फोनची मागणी करतो. ग्राहकांची हिच मागणी लक्षात घेऊन शाळा सु: होण्यापूर्वीच आम्ही पूर्वतयारी केली होती. त्यानुसार मागणीही होत असल्याने दिलासा मिळाला आहे,’ असे एका नामांकित दुकानाच्या व्यवस्थापकाने नाव न देण्याच्या अटीवरून सांगितले.

प्रवास र्निबधांमुळे ग्राहक घटले

गॅझेटची मागणी वाढल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये गर्दी असली तरी लॅमिंग्टन मार्ग येथील मोठय़ा बाजारपेठेत मनासारखा प्रतिसाद नसल्याने व्यापारी हताश आहेत. ‘सर्वसामान्यांना प्रवासाला मुभा असती तर बाजारपेठ गजबजली असती. सध्या जवळपासच्या भागांमधून येणाऱ्या किरकोळ ग्राहकांवर व्यवसाय सुरू आहे. त्यातही नव्या खरेदीपेक्षा दुरुस्तीसाठी येणारे ग्राहक अधिक आहेत,’ अशी खंत ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक असोसिएशनचे निमेश दोषी यांनी व्यक्त केली.

नवे काही.

गेल्या वर्षी मागणी वाढल्याने गॅझेटचा मोठा तुडवडा जाणवला होता. यंदा मात्र ग्राहकांची गरज लक्षात घेऊन नवनवीन उपकरणे बाजारात आली आहेत. काही नामांकित कंपन्यांसोबत इतरही नव्या कंपन्यांचे टॅब उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे बाजारातील स्पर्धा आणि ग्राहकांची मानसिकता याचा विचार करून मोठय़ा कंपन्यांकडून अनेक उत्तम प्रतीचे, जास्त क्षमतेचे आणि कमी किमतीचे फोन बाजारात आले आहेत. १० ते १५ हजारांच्या दरम्यान किं मत असलेल्या फोनला विशेष मागणी आहे.

लॅपटॉप हा सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांकडून वापरला जात असल्याने त्याला अधिक मागणी आहे. काही पालक भविष्याचा विचार कडून महागडे लॅपटॉप खरेदी करत आहेत. मागणीत वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेने हा प्रतिसाद कमी आहे. मात्र काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने तुटवडाही पडला आहे.

-गिरीश मठ्ठा, व्यवस्थापक, विजय सेल्स (चेंबूर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 1:52 am

Web Title: demand digital gadgets mobile schools markets ssh 93
Next Stories
1 एका नाल्यातील कचरा दुसऱ्या नाल्यात
2 आधी लसीकरण, मग चित्रीकरण
3 मलबार हिल येथे ‘हॉर्नबिल’ला फरसाणचे खाद्य
Just Now!
X