करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी के ंद्र व राज्य सरकारने त्याविरोधात एक युद्धच पुकारले आहे. या युद्धात जोखमीचे काम करणारा तळातला वर्ग आहे. त्यांनी सरकारकडे काही माफक अपेक्षा व्यक्त के ल्या आहेत. अशाच प्रकारे गाव, पाडे, वाडय़ा-वस्त्यात फिरून काम करणऱ्या आरोग्य केंद्रातील महिला परिचर या कर्मचाऱ्यांनी गणवेश, ओळखपत्र आणि महिन्याचे मानधन वेळेत मिळावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

राज्यात १० हजार आरोग्य उपकेंद्रात या महिला परिचर, आरोग्य केंद्रांची साफसफाई, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाडय़ा, वस्त्यांवर परिचारिकांबरोबर जाणे, रुग्णांच्या हातावर शिक्के  मारणे अशी जोखमीची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे त्यांच्याही अरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा विचार करून त्यांना आरोग्यविषयक साहित्य पुरविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने के ली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महिला परिचर हा  कर्मचारी वर्ग करोनाविरुद्धच्या लढाईत जोखमीचे काम करीत आहे. संचारबंदी असल्याने त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. तसेच गणवेशही देण्यात यावा. के वळ महिना तीन हजार रुपयांवर या महिला कर्माचारी काम करतात, परंतु ते  विलंबाने दिले जाते. ते वेळेत मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.