‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काइज’

मुंबई : दिवसेंदिवस बिघडत जाणारा हवेचा दर्जा पाहता नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करणे ही काळाची गरज बनत चालली आहे. त्यामुळे हवेचा दर्जा सर्वाधिक वाईट असणाऱ्या दिवशी नागरिकांना धोक्याचा इशारा आणि आरोग्यविषयक सल्ला देणारी यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारावी, अशी मागणी काही वातावरणविषयक स्वयंसेवी संस्थांनी के ली आहे. यासाठी प्रत्येक शहरातील पालिका आयुक्तांची भेट घेतली जाणार असून ऑनलाइन याचिकाही चालवली जात आहे.

संयुक्त राष्ट्रांनी ७ सप्टेंबर हा दिवस ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काइज’ म्हणून गेल्या वर्षी घोषित के ला. यानिमित्ताने विविध शहरांत स्वच्छ हवेसाठी मोहीम राबवली जात आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक प्रदूषणाच्या पातळीची माहिती देतो. जेथे हा निर्देशांक वाईट, अतिवाईट स्तरावर असतो तेथे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. कोळसाधारित ऊर्जा प्रकल्पांच्या जवळपास असणाऱ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये खालावलेली दिसते.

प्रदूषित हवेमुळे नागरिकांच्या आयुर्मानात घट होते. त्यामुळे जेव्हा हवेचा दर्जा सर्वाधिक खालावलेला असेल तेव्हा नागरिकांना धोक्याचा इशारा देईल व आरोग्यविषयक सल्ला देईल अशी यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारावी,

अशी मागणी वातावरण फाऊंडेशन, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ग्रीन प्लॅनेट सोसायटी अशा एकू ण १५ संस्थांनी के ली आहे. यासाठी प्रत्येक शहरातील पालिका आयुक्तांची भेट घेतली जाणार असून ऑनलाइन याचिकाही चालवली जात आहे.