07 March 2021

News Flash

मुंबईत दारासमोरुन बकऱ्या चोरल्या, माहिती देणाऱ्याला १ लाखाचे इनाम

दारासमोरुन बकऱ्या चोरी झाल्याने अस्वस्थ झालेल्या एका ४५ वर्षीय व्यापाऱ्याने चोरलेल्या बकऱ्यांची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.

दारासमोरुन बकऱ्या चोरी झाल्याने अस्वस्थ झालेल्या एका ४५ वर्षीय व्यापाऱ्याने चोरलेल्या बकऱ्यांची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. देवनार महापालिका कॉलनीमध्ये राहणाऱ्या मोहोम्मद मुस्तफा सिद्दीकी यांच्या दरवाजासमोरुन २७ मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी दुचाकीसह त्यांच्या पाच बकऱ्या चोरल्या. त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.

मोहोम्मद सिद्दीकी पत्नी, मुले आणि बहिणीसह देवनार महापालिका कॉलनीमध्ये राहतात. त्यांनी घरात काही बकऱ्या पाळल्या होत्या. त्यांचे त्या बकऱ्यांवर जीवापाड प्रेम आहे. काही वर्षांपूर्वी सिद्दीकी यांनी राजस्थानमधून जामनापरी प्रजातीची बकरीची एक जोडी विकत घेतली होती. त्या बकरीने पाच पिल्लांना जन्म दिला.

मोहम्मद यांच्यासह त्यांचे कुटुंबिय त्या बकऱ्यांची भरपूर काळजी घ्यायचे. २६ मे रोजी रात्री त्यांचे संपूर्ण कुटुंब गावावरुन परतले. प्रवासामुळे आम्ही थकलो होते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर आम्ही झोपून गेलो. त्या दरम्यान रात्री मी मुख्य दरवाजा बंद करण्यास विसरलो. मध्यरात्री तीनच्या सुमारास मला जाग आल्यानंतर मी बाहेर येऊन पाहिले. त्यावेळी बकऱ्या आणि माझी दुचाकी तिथे नव्हती. मी आसपास शोध घेतला, शेजाऱ्यांना विचारले पण कोणाला काहीच माहित नव्हते. त्यानंतर त्यांनी देवनार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बकऱ्या आणि दुचाकी चोरी झाल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 7:01 pm

Web Title: deonar goat stolen announces prize
Next Stories
1 दक्षिण मुंबईतील सिंदिया हाऊसला आग, जिवित हानी नाही
2 पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पाहा व्हिडिओ
3 …तर पेट्रोल डिझेलचे दर ७ ते ८ रुपयांनी कमी होतील-गडकरी
Just Now!
X