News Flash

देवनार पशुवधगृह १ ते ३ ऑगस्ट दरम्यान खुले

पालिकेच्या परिपत्रातील अटी-शर्तीनुसार परवानाधारक व्यापाऱ्यांना म्हैस आयात परवाना घेणे बंधनकारक आहे.

संग्रहित छायाचित्र

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने बकरी ईदनिमित्त धार्मिक पशुवधासाठी १ ते ३ ऑगस्ट दरम्यान सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत देवनार पशुवधगृह खुले ठेवण्यास परवानगी दिली आहे. अंतर नियमांचे पालन आणि आवश्यक ती खबरदारी दर दिवशी १५० म्हशींचा धार्मिक पशुवध करण्याची मुभा देण्यात आली आहे. पालिकेच्या परिपत्रातील अटी-शर्तीनुसार परवानाधारक व्यापाऱ्यांना म्हैस आयात परवाना घेणे बंधनकारक आहे. गृह विभागाच्या सूचनांची अंमलबजावणी करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:28 am

Web Title: deonar slaughter house open from 1st to 3rd august abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 प्रवासी क्षमतेत आजपासून वाढ
2 करोनाबाधितांची नावे उघड करण्यास नकार
3 राज्यातील करोना लढाईचा आढावा
Just Now!
X