News Flash

अमली पदार्थ तस्करीतून दहशतवादाला खतपाणी?

एमडी निर्मितीचे कारखाने या आधी राज्य दहशतवादविरोधी पथक, मुंबई गुन्हे शाखा, महसूल गुप्तचर संचलनालयाने उद्ध्वस्त केले.

आरोपींच्या पश्चिम आशियातील हवाला व्यवहारांचा छडा

मुंबई : मुंबईसह आसपासच्या शहरांतील तरुणाईला अमली पदार्थांच्या व्यसनाकडे खेचणाऱ्या तस्करांचे पश्चिम आशियातील दहशतवादी संघटनांशी संबंध असण्याची शक्यता बळावली आहे. डोंगरीतील ‘एमडी’ निर्मिती कारखाना चालवणारे अटक आरोपी चिंकू पठाण आणि आरिफ भुजावाला यांनी गेल्या काही वर्षांत पश्चिम आशियात हवालाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डोंगरी येथील नूर मंझिल या निवासी इमारतीत पठाण आणि भुजावाला यांनी चालवलेल्या कारखान्यात तयार करण्यात आलेला एमडीचा साठा छुप्या मार्गाने निर्यात केला जाणार होता. दुबईसह पश्चिम आशियातील काही देशांमधील अंमलीपदार्थ तस्करांशी या दोघांचे संबंध व आर्थिक व्यवहार तपासातून उघड झाले आहेत. एमडीनिर्मिती, विक्रीतून गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये कोट्यधीश झालेल्या पठाण, भुजवाला यांच्या माध्यमातून अतिरेकी संघटनांना, संघटित  गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक रसद पोहोचवली जात होती का, याचा आता तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, एमडी निर्मितीचे कारखाने या आधी राज्य दहशतवादविरोधी पथक, मुंबई गुन्हे शाखा, महसूल गुप्तचर संचलनालयाने उद्ध्वस्त केले. एटीएसने पश्चिाम उपनगरातील एका निवासी इमारतीत सुरू असलेला कारखाना उद्ध्वस्त के ला होता. एमडी निर्मिती करताना रासायनिक प्रक्रि येमुळे उग्र दर्प सुटतो. तो सहजासहजी दाबणे शक्य नाही. त्यामुळे पठाण, भुजवाला यांनी नूर मंझिलमध्ये एमडी निर्मिती करण्यासाठी काही विशेष व्यवस्था केली होती का, याचाही तपास सुरू आहे.  ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार नूर मंझिलमधील कारखान्यात आरोपी औषधी गोळ्यांची भुकटी मिसळून तयार एमडीचे प्रमाण वाढवण्याचेही काम मोठ्या प्रमाणावर करत होते.

मालमत्तांबाबत तपास सुरू

एनसीबीने भूजवाला, पठाण यांनी एमडी विक्रीतून खरेदी के लेल्या मालमत्ता, गुंतवणुकीबाबतही तपास सुरू के ला आहे. या तपासात दोघांनी कोट्यवधींची निवासस्थाने, व्यावसायिक गाळे, देशी-विदेशी महागडी वाहने गेल्या दोन वर्षांत विकत घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

डोंगरीत धरपकड

एनसीबीने शुक्र वारी सकाळीच डोंगरीतील चार ठिकाणांवर छापे घालत भूजवाला, पठाण यांच्या साथीदारांची शोधाशोध सुरू के ली. या दोघांच्या अटके नंतरच त्यांचे बहुतांश साथीदार पसार झाले आहेत. मात्र त्यापैकी एक साथीदार हाती लागल्याचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले. हा आरोपी पठाण, भूजवाला यांचा प्रमुख हस्तक आहे. चारही ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सीसीटीव्ही कवच

नूर मंझिलबाहेरील प्रत्येक हालचाल टिपता यावी यासाठी आरोपींनी इमारत, बाहेरील रस्त्यांवर सीसीटीव्हींचे जाळे उभारले होते. तसेच पोलीस या कारखान्यापर्यंत पोहचू नयेत यासाठी दारावर डीजीटल कु लूप लावले होते. गेल्या वर्षी गुन्हे शाखेच्या एका पथकाने नूर मंझिलवर छापा घातला होता. मात्र या पथकाला डीजीटल कु लूप उघडणे शक्य झाले नव्हते. तसेच सीसीटीव्हींतून पोलीस पथक इमारतीजवळ येताना पाहून आरोपींनी आधीच पलायन के ले होते.

डायरीत सेलेब्रिटींचीही नावे?

आरोपी पठाण याच्याकडे एक डायरी सापडली असून त्यात एमडी उत्पादक ते विक्रेत्यांपर्यंतचे साथीदार आणि ग्राहक वर्गाची नोंद आहे. ग्राहक वर्गात उद्योगपतींपासून चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींची नावे आढळल्याचा दावा, एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. या सर्वांकडे चौकशी होईल, असेही त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 3:12 am

Web Title: department of narcotics control terrorism from drug trafficking akp 94
Next Stories
1 नियम पाळूनही सवलतींची प्रतीक्षा
2 हार्बरवर लवकरच गोरेगाव-पनवेल लोकल
3 मराठी मालिकांचा आता अन्य भाषांमध्ये रिमेक
Just Now!
X