राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे करोनामुक्त झाले असून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. सुप्रिया यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी स्वतः ट्विट करुन आपल्या उत्तम आरोग्यसाठी सदिच्छा देणाऱ्यांचे आभार मानले.
राज्यातील कोट्यवधी जनता व कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच डॉक्टर,नर्स,सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,काही दिवस घरी विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचे आभार!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 2, 2020
करोनाच्या काळात सतत दौऱ्यांवर होते. विविध ठिकाणी भेटी, मंत्रालयातील बैठका तसेच अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. याच दरम्यान त्यांना काहीसा थकवा जाणवत होता. त्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर करोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आता उपचारानंतर ते करोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
दरम्यान, घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 1:51 pm