नवी मुंबईतील कोकण आयुक्तालयात सामान्य प्रशासन विभागात उपायुक्तपदी कार्यरत असलेले भाऊसाहेब ज्योतिबा पाटील यांनी सुमारे ११ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून ठाणे लाचलुचपत विभागाने शुक्रवारी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली़
अप्पर जिल्हाधिकारी वर्गात मोडणाऱ्या भाऊसाहेबांकडे मोठय़ा प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता असल्याच्या तक्रारी ठाणे लाचलुचपत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार अधिक तपासणी केली असताना भाऊसाहेबांकडे सुमारे ११ कोटी ३४ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गेल्या २८ वर्षांपासून भाऊसाहेब शासकीय सेवेत कार्यरत आहेत.