भारतीय पोलीस सेवेसह राज्य पोलीस सेवेतील ८९ उपायुक्त, अधिक्षकांच्या बदल्या, बढत्या सोमवारी जाहीर झाल्या.

मुंबई पोलीस दलातील उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड आणि विक्रम देशमाने यांची दहशतवादविरोधी पथक, सचिन पाटील राज्य राखीव पोलीस बल, अभिषेक त्रिमुखे राज्य पोलीस मुख्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक(नियोजन व समन्वय) बदली करण्यात आली.

एटीएसचे अधिक्षक मोहन दहिकर, मरोळच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सोमनाथ घार्गे, एसआरपीएफ, नागपूरचे समादेशक चंदर मीना, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे(नागपूर) अधिक्षक रंजन शर्मा, भिवंडीचे उपायुक्त अंकित गोयल, नाशिक पोलीस अकादमीचे उचसंचालक नंदकुमार ठाकूर, ठाण्याचे उपायुक्त डी. एस. स्वामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक श्रीकांत परोपकारी यांना मुंबईत उपायुक्त म्हणून नेमण्यात आले.