05 April 2020

News Flash

सुरक्षारक्षकाचा खून करून पसार झालेला अटकेत

पोलिसांनी सापळा रचून पांडेला अटक केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : पवईत सुरक्षारक्षकाचा खून करून फरार झालेल्या एकाला पोलिसांनी नवी दिल्लीत अटक केली आहे. अविनाशकुमार लक्ष्मीकांत पांडे (३८) असे आरोपीचे नाव आहे. पवई परिसरातील साकीविहार येथील ‘लोढा सुप्रीमस’ या इमारतीतील सुरक्षारक्षक देवीप्रसाद सिंग याचा ऑक्टोबर महिन्यात पांडेने खून केला होता.

पांडेने याआधी उत्तरप्रदेशात दोन जणांचे खून केले होते. त्यानंतर तेथून त्याने पळ काढला होता. त्याला पकडून देणाऱ्याला १० हजार रुपयांचे बक्षीस उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केले होते.

पांडे महाराष्ट्रात आल्यानंतर नाव बदलून राहत होता. पांडेचे सिंग यांच्याबरोबर किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग धरून त्याने सिंग यांचा खून केला. त्यानंतर तो दिल्लीला पळून गेला.

पवई पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. पांडे नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पांडेला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 6:51 am

Web Title: detectives murdered by security guards arrest crime news akp 94
Next Stories
1 लॅबर्नम रस्त्याची ‘सुवर्णकिनार’ नामशेष होण्याच्या मार्गावर!
2 कंत्राटे देऊनही तीन पूल अधांतरी
3  जुन्या बेअरिंग काढण्यात विलंबामुळे वेळापत्रक फिस्कटले!
Just Now!
X