मुंबई महापालिकेने सुधारित प्रारूप विकास आराखडय़ातील आरक्षणाची मार्गदर्शक तत्त्वे ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे सुधारित प्रारूप आराखडय़ात कोणती आरक्षणे वगळली आहेत व घेण्यात आली आहेत याची माहिती नागरिकांना मिळू शकणार आहे.

मुंबई महापालिकेने फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रकाशित केलेल्या प्रारूप विकास आराखडय़ावर अनेकांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्यामुळे त्यानंतर आता प्रसिद्ध झालेल्या सुधारित प्रारूप विकास आराखडा २०३४ यात कोणती आरक्षणे घेण्यात आली आहेत व कोणती आरक्षणे वगळण्यात आली आहेत, तसेच आरक्षणांबाबत काय निर्णय घेण्यात आले आहेत हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने या आराखडय़ातील मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांच्या माहितीस्तव ऑनलाइन खुली केली आहेत.

या मार्गदर्शक तत्त्वांवरून नागरिकांना विकास आराखडय़ातील आरक्षणांबाबत संपूर्ण माहिती होऊ शकणार आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे महापालिकेच्या ६६६.ेूॠे.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.