News Flash

मुख्यमंत्र्यांनी गट-तट बाजूला ठेऊन सर्वांची काम केली – रणजितसिंह मोहिते-पाटील

सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपाचा झेंडा हाती घेतला.

(संग्रहित छायाचित्र)

सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपाचा झेंडा हाती घेतला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर समर्थकांसमोर बोलताना त्यांनी भाजपाच्या सत्ताकाळात प्रगती झाल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही वेळोवेळी विकासकामांसाठी भाजपा नेत्यांनी केलेल्या सहकार्याचा रणजिंतसिंह यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गट-तट पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सर्वांची काम केली. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राची प्रगती झाली आहे असे त्यांनी सांगितले. नितीन गडकरींच्या माध्यमातून सोलापूर जिल्हयात महामार्गाची चांगली कामे झाली आहेत. अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण झाले.

सोलापूरच्या विकासालाा वेग मिळाला असे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे. विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे असे ते म्हणाले. उजनी धरण, पाण्याच्या प्रश्नांसदर्भात गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. प्रश्न मार्गी लावले असे रणजितसिंह यांनी सांगितले. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह यांनी प्रवेश केला त्यावेळी भाजपाची बडी नेतेमंडळी गरवारे सभागृहात उपस्थित होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपा अजून बळकट होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 2:34 pm

Web Title: devendra fadanvis never done politics on development issue ranjitsingh mohite patil
Next Stories
1 विजयदादांच्या आशीर्वादानेच रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये – देवेंद्र फडणवीस
2 होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा संताप; मांडवी एक्सप्रेसला तीन तास उशीर
3 सोलापूरात राष्ट्रवादीला धक्का, रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपामध्ये प्रवेश
Just Now!
X