News Flash

म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा शनिवारी मुंबईत पार पडली आणि त्यात फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली

(संग्रहित छायाचित्र)

रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हे पद भूषविले होते.

रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा शनिवारी मुंबईत पार पडली आणि त्यात फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या सभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्राबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ पासून आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी फडणवीस यांची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक परिषदेशी संलग्न असलेली रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनी १९८२ पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:31 am

Web Title: devendra fadnavis as the president of mhalgi prabodhini abn 97
Next Stories
1 हिरेन कुटुंबाचे पोलीस आयुक्त, एटीएसला पत्र
2 “कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला इशारा!
3 बेळगावमध्ये मराठी लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान, गृहमंत्री गप्प का? – संजय राऊत
Just Now!
X