21 September 2020

News Flash

देवेंद्र फडणवीस बिहारचे निवडणूक प्रभारी?

बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे

संग्रहित छायाचित्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारसाठी निवडणूक प्रभारी म्हणून लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी प्रथमच दिली जाणार आहे. ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव हे बिहारसाठी पक्ष प्रभारी असून फडणवीस हे त्यांच्यासमवेत निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील, असे दिल्लीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संयुक्त जनता दलाबरोबर भाजप निवडणूक रिंगणात उतरणार असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच जाहीर केले आहे.

भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची निवडणूक तयारीची बैठक गुरुवारी रात्री दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पार पडली. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींसह ज्येष्ठ भाजप नेते, भूपेंद्र यादव व देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. फडणवीस यांच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्तीची घोषणा लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याबरोबर आशीष शेलार यांच्यासह काही नेत्यांना बिहारमध्ये पाठविले जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:24 am

Web Title: devendra fadnavis in charge of bihar elections abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीवर ४० लाख खर्च करण्याचा घाट
2 गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या १८२ विशेष फेऱ्या
3 युती सरकारच्या काळातील शिक्षक मान्यता घोटाळ्याची चौकशी
Just Now!
X