27 May 2020

News Flash

‘कुणी उपाशी झोपणार नाही, याची काळजी घ्या’

देवेंद्र फडणवीस यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

संग्रहित छायाचित्र

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दोन वेगवेगळ्या संवादसेतूच्या माध्यमातून सुमारे ३१ हजार कार्यकर्त्यांंशी संवाद साधला. कुणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांंना केले.

पक्षाच्या सुमारे ५०० मंडळांमध्ये भाजपचे सेवाकार्य सुरू झाले आहे. ५०० कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दोन लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय, जे घरी अन्न बनवू शकतात, अशांकडे तेल, तिखट, मीठ, धान्य अशी किट उपलब्ध करून दिली जात आहे. पालघर, सिंधुदुर्ग तसेच मराठवाडय़ातील स्थलांतरितांना तेथेच थांबवून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजूंना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. ग्रामीण भागात चारा तसेच शेतकऱ्यांना खत—बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 12:47 am

Web Title: devendra fadnavis interacts with activists abn 97
Next Stories
1 अन् पोलिसांमुळे त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला..
2 ‘घरून काम’ खर्चिक  आणि व्यत्यय आणणारे
3 मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग
Just Now!
X