01 October 2020

News Flash

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये ‘गुफ्तगू’

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

| June 5, 2013 12:52 pm

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मी केवळ सदिच्छा भेट घेतली. यातून कोणताही राजकीय अन्वयार्थ काढू नका, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. 
फडणवीस यांनी बुधवारी सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कृष्णकुंजमधून बाहेर आल्यावर फडणवीस पत्रकारांना म्हणाले, आजच्या राज ठाकरे यांच्या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ नाही. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यावर मी सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार, असे सांगितले होते. त्यानुसार आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यातून कोणताही राजकीय अन्वयार्थ काढू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2013 12:52 pm

Web Title: devendra fadnavis meet raj thackeray in mumbai
Next Stories
1 अकाली जीवनाचा अंत करणारी जिया एकटीच नाही..
2 ‘फिक्सर’ना मोक्का!
3 मराठी पर्यटन संस्थांचा प्रवास कोणत्या ‘देशी’?
Just Now!
X