मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांचा आदेश
मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपा शिवसेना युती जिंकेल त्यामुळे पूर्ण विश्वसाने कामाला लागा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या आमदारांना दिला
युतीची घोषणा झाल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षां या निवासस्थानी आमदारांसाठी सोमवारी रात्री स्न्ोहभोजन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ठाकरे यांनी आमदारांशी संवाद साधला. युतीच्या आमदारांचे हे गेल्या तीन वर्षांनंतरचे पहिले एकत्रित स्न्ोहभोजन होते केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी बरीच कामे केली आहेत. त्याचे कोटय़वधी लाभार्थी राज्यात आहेत. सरकारने केलेले हे काम आपापल्या मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचवा. त्यातून युतीचा विजय होईल, असा विश्वस या नेत्यांनी व्यक्त केला. सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचा समन्वय व्हावा यासाठी बैठका घ्या, प्रचाराचे तपशीलवार नियोजन करा, असेही या नेत्यांनी आमदारांना सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 12:53 am