02 March 2021

News Flash

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ

पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधीत डाव्या विचारसरणींच्या लोकांवर देशभरात महाराष्ट्र पोलिसांकडून सध्या छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पडसलगीकर यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवेमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पडसलगीकर येत्या शुक्रवारी (दि.३१) निवृत्त होणार होते. मात्र, तत्पूर्वी मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी पडसलगीकर यांच्या मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला.

जनहितार्थ महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना ३१ ऑगस्ट २०१८ रोजीच्या निवृत्ती तारखेनंतर पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे कार्मिक मंत्रालयाने म्हटले आहे. पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

पुण्यातील एल्गार परिषदेशी संबंधीत डाव्या विचारसरणींच्या विचारवंतांवर देशभरात महाराष्ट्र पोलिसांकडून सध्या छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. यांपैकी चार जणांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पडसलगीकर यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 8:11 pm

Web Title: dgp datta padsalgikar gets 3 months extension
Next Stories
1 १० वी फेरपरीक्षेचा निकाल २९ ऑगस्टला
2 जाणून घ्या काय आहेत राज्यातील वीटभट्टीधारकांसाठीचे नवे नियम
3 छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांची भेट, राजकीय तर्कांना उधाण
Just Now!
X