20 September 2020

News Flash

..तर गुटखा माफिया हत्या करायला मागे-पुढे पाहणार नाहीत – धनंजय मुंडे

गुटखा बंदी असली तरी खुलेआम गुटख्याची विक्री आणि उत्पादन सुरु आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला

धनंजय मुंडे

राज्यात गुटखा बंदी असली तरी खुलेआम गुटख्याची विक्री आणि उत्पादन सुरु आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. गुटखा बंदीच्या विषयावरुन आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मार्च महिन्यात विधानसभेच्या अधिवेशनात मी जेव्हा गुटखा बंदीचा संदर्भात प्रश्न उपस्थित केला तेव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमक्या मिळाल्या. आता गुटख्याची गाडी सोडावी म्हणून पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटख्याची गाडी सोडावी यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्याला धमकावले जाते. याचा अर्थ राज्यात बंदी असतानाही खुलेआम गुटख्याची विक्री आणि उत्पादन सुरु आहे असे ते म्हणाले.

मी सातत्याने हा विषय लावून धरला आहे पण सरकार काहीच करत नसल्याने गुटखा माफियांची पोलिसांना धमकी देण्यातपर्यंत मजल गेली आहे. उद्या हे गुटखा माफिया कोणाचा खून करायलाही मागेपुढे पाहणार नाही असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2018 2:15 pm

Web Title: dhananjay munde ncp leader guthkha mafia threats
टॅग Dhananjay Munde,Ncp
Next Stories
1 नियमांना बगल देण्याची माझी सवयच आहे-शरद पवार
2 VIDEO: लोकलसमोरील आत्महत्येचा काळीज हेलावणारा व्हिडीओ CCTVत कैद
3 गोव्यात अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, पोलिसाला अटक
Just Now!
X