06 March 2021

News Flash

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट; केली महत्त्वाची मागणी

मुंबई पोलीस सहआयुक्त पाटील यांच्या कार्यालयात झाली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने त्यांच्यावरील तक्रार मागे घेतली. काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. पण अचानक हा आरोप तिने मागे घेतला. या प्रकारानंतर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या आक्रमक झाल्या असून त्यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली आणि महत्त्वाची मागणी केली.

गडचिरोली: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मोठं यश

धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोप धक्कादायक होता. पण ज्या पद्धतीने तक्रार मागे घेतली गेली, तेदेखील तितकंच धक्कादायक आहे, असं मत वाघ यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. “मुंबईपोलिस सहआयुक्तांची भेट घेत खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी केली. हे प्रकरण धनंजय मुंडे – रेणू शर्मापुरते मर्यादित नसून यात योग्य कारवाई झाली नाही, तर याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकी-बाळींना भोगावे लागतील. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी”, अशी मागणी केल्याचे ट्विट चित्रा वाघ यांनी केले.

“रेणू शर्मा हिने बलात्कारासारखा गंभीर आरोप करुन नंतर तक्रार मागे घेतल्यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. अशा परिस्थितीत खोटे आरोप केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करायला हवी. खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ IPC192 नुसार कारवाई करावी”, असे मत चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे आधीच केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 5:37 pm

Web Title: dhananjay munde renu sharma rape case bjp leader chitra wagh visits mumbai police vishwas nangare patil with special request vjb 91
Next Stories
1 देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले कृष्णकुंजवर
2 अमली पदार्थ तस्करीतून दहशतवादाला खतपाणी?
3 नियम पाळूनही सवलतींची प्रतीक्षा
Just Now!
X