News Flash

‘तर सरकारला पळता भुई थोडी करू’!

अंधश्रद्धा निर्मूलनविरोधी कायदा आणण्याच्या नावाखाली राज्य सरकार हिंदू समाजाच्या श्रद्धांवरच घाला घालण्याचे काम करत आहे. हा कायदा आणल्यास सरकारला पळता भुई थोडी करू, असा इशारा

| April 12, 2013 03:43 am

अंधश्रद्धा निर्मूलनविरोधी कायदा आणण्याच्या नावाखाली राज्य सरकार हिंदू समाजाच्या श्रद्धांवरच घाला घालण्याचे काम करत आहे. हा कायदा आणल्यास सरकारला पळता भुई थोडी करू, असा इशारा विविध वारकरी संप्रदाय, हिंदू जनजागृती समिती, जैन संघटना तसेच सनातन संस्थेने आझाद मैदानावरील आंदोलनात दिला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ, वीज, बेरोजगारीसह असंख्य प्रश्न शिल्लक असताना त्याची सोडवणूक करण्यास प्राधान्य देण्याऐवजी सरकार हिंदूंच्या धार्मिक भावना चिरडण्याचा उद्योग करणार असेल तर लाखो वारकरी, संत-महंतासह संपूर्ण हिंदू समाजाचा सामना सरकारला करावा लागेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे समन्वय शिवाजी व्हटकर यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 3:43 am

Web Title: different hindu organisation warn state government over anti superstition bill
टॅग : Maharastra Government
Next Stories
1 राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय पाटील यांच्यावर खुनी हल्ला
2 इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी दोघांना अटक
3 क्रिकेटच्या वादातून तरुणाची हत्या
Just Now!
X