03 March 2021

News Flash

दिलीप कुमार यांच्या भावाचं करोनामुळे निधन

वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सौजन्य : जनसत्ता

बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचं अस्लम खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्लम खान यांनी करोनाची लागण झाली होती. त्यांमुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या एहसान खान (९० वर्ष) आणि अस्लम खान(८८ वर्ष) या दोन्ही भावांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अस्लम खान यांचं अखेर निधन झालं आहे. अस्लम खान यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या, असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसान खानदेखील करोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 10:10 am

Web Title: dilip kumar brother aslam khan passed away due to covid19 ssj 93
Next Stories
1 Sarva Karyeshu Sarvada : दानयज्ञ उद्यापासून
2 झेंडूचे भाव कडाडले 
3 ग्रंथनिवडीची संपूर्ण यंत्रणाच सदोष!
Just Now!
X