लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फलाट क्रमांक चिन्हांचे आणि दिशादर्शक फलक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवाशांना दूर अंतरावरूनही सहजपणे या फलकावरील फलाट क्रमांक व अन्य माहिती समजेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सीएसएमटीत फलाट क्रमांक एक ते सात येथे तीन दिशादर्शक फलक आहेत. फलाट क्रमांक ८ ते १८ येथे दोन दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. या फलकांवर फलाटांच्या माहितीबरोबरच चौकशी व तिकीट खिडक्या, प्रसाधनगृह, रेल्वे पोलीस ठाणे, प्रतीक्षालय, खाद्यपदार्थ स्टॉल्स इत्यादी माहितीही आहे.