News Flash

‘ठाकरे’ स्पेशल स्क्रिनिंग; अपमानित झाल्याने दिग्दर्शक अभिजित पानसेंनी सोडले सिनेमागृह

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये डावलल्याने पानसे हे स्क्रिनिंगमधून उठून गेल्याचे सांगण्यात येते.

'ठाकरे' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले.

‘ठाकरे’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. मात्र पानसे आपल्या कुटुंबीयांसह सिनेमागृहातून निघून गेले. मुंबईतील अॅट्रिया सिनेमागृहात सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू होते.

अभिजित पानसे अपमानित झाल्याने सिनेमागृहातून निघून गेल्याचे सांगण्यात येत असले तरी विविध वृत्त वाहिन्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. स्क्रिनिंगसाठी ते उशिरा पोहोचल्यामुळे राऊत यांच्याशी त्यांची बाचाबाची झाल्याचे काहींनी म्हटले तर चित्रपटाच्या प्रमोशनमधून डावलल्याने पानसे यांनी हे पाऊल उचलल्याचे काही वृत्त वाहिन्यांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. तर एका वृत्त वाहिनीने सिनेमागृहात कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे हे सिनेमागृहातून बाहेर गेल्याचे सांगितले. दरम्यान, पानसे हे कशामुळे संतापले हे समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 9:12 pm

Web Title: director abhijit panse suddenly quit the screening show of thackeray movie
Next Stories
1 ICAI CA Result 2018 : सिद्धांत भंडारी, शादाब हुसैन देशात प्रथम
2 कुंभमेळ्यात अन्नपदार्थ, पाण्यामध्ये रसायन मिसळून हल्ला करण्याचा कट एटीएसने उधळला
3 मंत्रालय पत्रकारांना विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पात 50 टक्के आरक्षण
Just Now!
X