News Flash

‘टाईमपास ३’ वादाच्या भोवऱ्यात

हा चित्रपट पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात वाद झाला आहे.

मुंबई : चित्रपटांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण विषय मांडणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘टाईमपास ३’ या आगामी चित्रपटाच्या मार्गात निर्मात्यांनीच अडसर घातला आहे.

या चित्रपटाचे सर्व हक्क निर्मात्याकडे असल्याचे दावा मौर्य फिल्म्स अँड एन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थेने केला आहे. परंतु ‘ज्यांनी निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पैशांची पूर्तताच केली नाही त्यांनी चित्रपटाचे हक्क मागणे खोडसाळपणाचे लक्षण आहे,’ अशी स्पष्टोक्ती दिग्दर्शक रवी जाधव यांनी केली आहे.

‘टाईमपास’ आणि ‘टाईमपास २’च्या यशानंतर ‘टाईमपास ३’ या चित्रपटाची निर्मिती रवी जाधव करत आहेत. परंतु हा चित्रपट पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यात वाद झाला आहे.

मौर्य फिल्मचे राजकुमार ढाकने यांनी ‘टाईमपास ३’चे सर्व अधिकार कायदेशीररीत्या निर्मिती संस्थेचे असल्याचा दावा करत वृत्तपत्रात नोटीस दिली आहे. ‘चित्रपटाची पटकथा, साऊंड ट्रॅक, ब्रँड नेम्स आदी सगळ्यांवर निर्मिती संस्थेचा हक्क आहे. निर्मात्याच्या लेखी परवानगीशिवाय याचा वापर झाला तर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. परंतु हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा दिग्दर्शक रवी जाधव यांनी केला आहे.

निर्मात्यांनी केलेले आरोप  खोटे आहे. ‘टाईमपास’ आणि ‘टाईमपास २’चेही हक्क माझ्याकडे असल्याने याही चित्रपटाचे हक्क माझ्याकडेच आहेत, असेही जाधव म्हणाले. ‘निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीतील पैशांची पूर्तता केली नसल्याने त्यांचा करार रद्द झाला आहे. त्यामुळे अशा कृत्यातून काहीही साध्य होणार नाही,’ असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 1:42 am

Web Title: director ravi jadhav timepass 3 through films akp 94
Next Stories
1 “देशाला लागलेली करोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण”- तेजस्विनी पंडीतचा संताप
2 राजकुमार हिरानीचे दोन नवे चित्रपट; एकात किंग खान तर एकात रणबीर कपूर
3 शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी पाहिलीत का? आई मीराने शेअर केले फोटो
Just Now!
X