मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या आईचं निधन झालं आहे. वृद्धपकाळामुळे वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २८ जुलै रोजी पहाटे झोपेत असतानाच त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ललिता केंकरे असं विजय केंकरे यांच्या आईचं नाव असून त्या दिग्गज अभिनेत्रीदेखील होत्या. अनेक नाटकं आणि चित्रपटामध्ये काम करुन त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटविला होता.विजय केंकरे यांची आई असण्यासोबतच त्या नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या पत्नी होत्या.
दरम्यान, दामू केंकरे दिग्दर्शिक ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकात त्यांनी भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनामुळ कलाविश्वातील अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्यापूर्वी २००८ मध्ये दामू केंकरे यांचे निधन झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 2:40 pm