01 October 2020

News Flash

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची बाधा, लीलावती रुग्णालयात दाखल

काही दिवसांपासून होम क्वारंटाइन होते विजय केंकरे

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना सौम्य ताप येत होता. त्यामुळे ते होम क्वारंटाइन होते, मात्र आता त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच विजय केंकरे यांची आई ललिता केंकरे यांचं नुकतंच निधन झालं होतं. त्यानंतर विजय केंकरे घरीच होते.

आज त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेले आठ ते नऊ दिवस त्यांना ताप येत होता. त्यांची करोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली अशी माहिती अभिनेते विनय येडेकर यांनी दिली.

विजय केंकरे यांनी अनेक यशस्वी नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. सुयोग या संस्थेची सर्वाधिक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली. दिग्दर्शक म्हणून आपल्या शैलीचा एक वेगळा ठसा त्यांनी रंगभूमीवर उमटवला. भाई व्यक्ती की वल्ली आणि मुंबई पुणे मुंबई या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिकांचंही कौतुक झालं आहे. दरम्यान त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अभिनेते विनय येडेकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 8:18 pm

Web Title: director vijay kenkre corona positive admitted in lilavati hospital scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल, जाणून घ्या विजय मल्ल्या कनेक्शन
2 अखेर स्वप्न पुर्ण झालं; अभिनेत्याने कतरिनासोबत काम करण्यासाठी पाहिली होती वर्षभर वाट
3 शिल्पा शेट्टीने केला सासूबाईंसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X