23 October 2020

News Flash

पश्चिम रेल्वेच्या अपंग प्रवाशांना लोकल प्रवासाची प्रतीक्षा

मध्य रेल्वेकडून मात्र मुभा; अपंग प्रवासी व तिकीट कर्मचाऱ्यांमध्ये वाद

मध्य रेल्वेकडून मात्र मुभा; अपंग प्रवासी व तिकीट कर्मचाऱ्यांमध्ये वाद

मुंबई : मध्य रेल्वेने लोकल प्रवासाची परवानगी असतानाही पश्चिम रेल्वेकडून मात्र अपंग प्रवाशांना मज्जाव के ला जात आहे. रेल्वेचा उफराटा कारभार माहीत नसल्याने अनेक अपंग प्रवासी पश्चिम रेल्वेवर धडकत आहेत. मात्र त्यांना प्रवास नाकारला जात असल्याने रेल्वे कर्मचारी आणि अपंग प्रवाशांमध्ये वाद होत आहेत.

सरकारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच विविध श्रेणीतील अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी टप्प्याटप्यात दिली जात आहे. मध्य रेल्वेने ८ ऑक्टोबरला काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात अपंग, कर्करोगग्रस्तांबरोबर अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली. अपंग प्रवाशांना त्यासंबंधीचे प्रमाणपत्र दाखवून लोकलच्या राखीव डब्यातून प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून अद्यापही अपंग प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बराच गोंधळ उडतो आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांत अशा अनेक अपंग प्रवाशांना पश्चिम रेल्वेवर प्रवास नाकारण्यात आला. अपंग प्रवाशांची समजूत काढताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्याही चांगलेच नाकीनऊ येत असून प्रसंगी खटके ही उडत आहेत. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांच्याकडे विचारणा के ली असता ९ ऑक्टोबरला संबंधित प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगितले. यामुळे रेल्वे बोर्डाचा गोंधळाचा कारभार दिसून येतो.

अपंगांची परवड

विरारचे चंद्रा देवेंद्र अंध असून मुंबईत एका खासगी कं पनीत कामाला आहेत.  गेली चार वर्षे अंध स्वयंविकास संस्थेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. टाळेबंदीच्या काळात ते स्वत: अंधांना जीवनावश्यक वस्तू पुरवतात. त्या निमित्ताने दादरला जाण्यासाठी त्यांनी विरार स्थानक गाठले असता  अपंग प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.  ‘गेले सात महिने आमची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे लोकांकडून मिळालेली मदत आम्ही गरजूपर्यंत पोहोचवत असतो. यासाठी खासगी वाहन परवडत नाही. शिवाय मुंबईत जायचे म्हटले तर तीन बस बदलाव्या लागतात. अंधांसाठी बसचा प्रवास जोखमीचा आहे. त्यामुळे आम्हाला रेल्वे प्रवासाशिवाय पर्याय नाही. ९ ऑक्टोबरला अपंगांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाल्याचे समजल्याने स्थानकात गेलो. परंतु हा नियम रद्द झाल्याचे सांगण्यात आले, तर काहींनी अजून अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत प्रवेश नाकारला, असे चंद्रा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:25 am

Web Title: disabled passengers waiting for permission from western railway for local travel zws 70
Next Stories
1 मुखपट्टय़ा न लावणाऱ्यांविरोधात आता पोलीस कारवाई
2 मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७१ दिवसांवर
3 पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल
Just Now!
X