28 September 2020

News Flash

कर्तृत्ववान, प्रेरणादायी नवदुर्गाचा शोध

सर्वासाठी आदर्शवत ठरणाऱ्या अशा महिलांचा ‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी गौरव करण्यात येतो.

(संग्रहित छायाचित्र)

आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या आणि अनेकांना प्रेरणादायी ठरलेल्या नऊ ‘दुर्गा’चा नवरात्र उत्सवानिमित्ताने ‘लोकसत्ता’तर्फे सन्मान केला जातो. असीम कार्यामुळे असामान्य ठरलेल्या आपल्या परिसरातील अशा दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’कडे पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

एखाद्या महिलेने कोणतीही रचनात्मक गोष्ट करण्याचा निश्चय केला की कितीही संकटे आली तरी ती त्यांवर मात करते. मग तिचे काम वैयक्तिक पातळीवरचे असो की सामाजिक स्तरावरचे. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध केले आहे. अशा अनेक दुर्गाचे प्रेरणादायी कार्य गेली सहा वर्षे सुरू असलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा’ या उपक्रमातून समाजापुढे आले. त्यापैकी काही महिला शहरांतील होत्या, तर काही ग्रामीण भागातील.

विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.

काही जणी अनेक अडचणींशी टक्कर घेत रूढ अर्थाने यशस्वी झाल्या होत्या, तर काहींनी वैयक्तिक पातळीवरच, पण प्रामाणिकपणे काम करून इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला होता. सर्वासाठी आदर्शवत ठरणाऱ्या अशा महिलांचा ‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी गौरव करण्यात येतो.

पुरस्काराविषयी..

* दुर्गाची माहिती २० सप्टेंबर २०२० पर्यंत ‘लोकसत्ता’कडे पाठवावी.

* माहितीबरोबर त्या कर्तृत्ववान महिलेचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी पाठवणे आवश्यक.

* आलेल्या माहितीमधून परीक्षक समिती नऊ दुर्गाची निवड करेल.

* नवरात्रीत दररोज एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाईल.

* एका सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते दुर्गाचा सन्मान केला जाईल.

माहिती कुठे पाठवाल?

दुर्गाविषयी माहिती loksattanavdurga@gmail.com  या ई-मेल आयडीवर वा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी.

‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२०’साठी असा ठळक उल्लेख करावा. कृपया आपली नामांकने मराठीमध्ये पाठवावी

हे महत्त्वाचे.. उद्योग, शिक्षण, संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, त्यात कर्तृत्व दाखवलेल्या तुमच्या परिचयातील ‘दुर्गा’ची माहिती पुरस्कारासाठी पाठवू शकता. ही माहिती २० सप्टेंबपर्यंत   पाचशे शब्दांत आणि नोंदी स्वरूपात पाठवावी. या महिलांचे काम विधायक, समाजावर सकारात्मक, चांगला परिणाम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:21 am

Web Title: discovery of a capable inspiring loksatta navdurga abn 97
Next Stories
1 २० हजारांहून अधिक पोलिसांना संसर्ग
2 दोन दिवसांत अंतिम निर्णय
3 मुंबईत दिवसभरात २,३५२ करोनाबाधित
Just Now!
X